Jcoet

आज दिनांक 14 मार्च 2024 रोजी जगदंबा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथे महिला दिन कार्यक्रम आयसीसी समिती अंतर्गत घेण्यात आला.  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नेहा पडवळे आणि डॉ.कविता करोडदेव (बोरकर) उपस्थित होते, प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.जी.नेवे सर,आयसीसी समितीच्या प्रभारी प्रा. एन.के. चौकडे ,प्रा. डी.बी.पोहरे,प्रा.एस.आर.राऊत, प्रा.पी.डी.ठाकरे डॉ.एम.बी.वसू, , प्रा.पी.डी.नखाते आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.माँ सरस्वतीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही.जी. नेवे सरांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे भाषण केले. डॉ. नेहा पडवळे यांनी आपले भाषण  “रागाच्या समस्येचे व्यवस्थापन कसे करावे, आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी” याविषयी मार्गदर्शन केले.आणि डॉ.कविता करोडदेव (बोरकर)यांनी विद्यार्थ्यांना “योगाचे महत्त्व, प्रत्येकाच्या जीवनात व्यायामाचे महत्त्व, आहार” याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन प्रा.व्ही.एस.गिरी यांनी केले.अशा प्रकारे कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला.